दिभना ग्रामपंचायत, जि. प. गडचिरोली - 442704 | महाराष्ट्र +91 9579774624
dibhana-grampanchayat-gadchiroli-logo

दिभना ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

आज दिनांक 20/11/2025 रोज गुरुवार la सकाळी 8 वाजता महाश्रमदान कार्यक्रम घेण्यात आला

आज दिनांक 20/11/2025 रोज गुरुवार la सकाळी 8 वाजता महाश्रमदान कार्यक्रम घेण्यात आला श्रमदान अंतर्गत काळू सलाम ते गोठेघाट पांदन रस्ता तयार करण्यात आला.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोकसहभागातून आणि श्रमदानातून गावाचा विकास करणे हा मुख्य उद्देश असल्याने ग्रामपंचायत दिभनाने गावातून गावाच्या विकासासाठी एक पाउल पुढे टाकलेले आहे यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय भुयार सर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय अनिकेत पाटील सर गावचे सरपंच रमेश गुरनुले उपसरपंच ज्योती जेगठे इतर ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते विलास जेगठे, अण्णाजी जेगठे. डीमराज गुरनले,भोजराज जेठे ,रावजी शेंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील महिला बचत गट ,युवक वर्ग, गावातील कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी वासंती देशमुख यांनी लोकसहभाग व श्रमदानातून जास्तीत जास्त कामे करण्याचा ग्रामपंचायतीचा नियोजन असल्याचे सांगितले.

मागे जा