दिभना ग्रामपंचायत, जि. प. गडचिरोली - 442704 | महाराष्ट्र +91 9579774624
dibhana-grampanchayat-gadchiroli-logo

दिभना ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

आमच्याबद्दल

स्वच्छ गाव | सुंदर गाव | प्रत्येक पाऊल प्रगतीकडे

ग्रामपंचायत दिभणा

Village Activity

मनोगत

ग्रामपंचायत दिभनाच्या वतीने अभियान काळावधीत अनेक स्तुत्य असे उपक्रम राबविण्यात आले. यातून ग्रामस्थांना तरुण युवक, युवती यांना ग्रामीण स्वच्छतेचे महत्व कळून आरोग्यमान पर्यायाने जीवनमान उंचावण्यासाठी निश्चित मदत होईल. असा ठाम आत्मविश्वास वाटतो. गावच्या असलेला सक्रीय लोकसहभाग सादर करतांना मनस्वी आनंद होत आहे.
ग्रामपंचायत ही ग्रामीण जनतेच्या विकासासाठी सामाजिक ऐक्याची पवित्र मंदिर आहे. या समाजसेवक विकासात्मक पवित्र मंदिराचे पवित्र कायम राखण्यासाठी ग्रामीण जनतेची सर्वांगीण सुबत्ता अधिक दृढ करून प्रशासन व विकासाभिमुख होण्यासाठी लोकनेते, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनी तनमन धनाने सहकार्य होऊन सर्वांगीण स्वच्छतेची मोहीम ही अखंड चळवळ म्हणून जीवनक्रम बनविण्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प करूया.
सन २०१०-११ वर्षांपर्यंत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधून १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्यात आलेले असून अंगणवाडी, ग्रामपंचायत, जि.प. शाळा, ई. शासकीय इमारतीत १०० टक्के शौचालय पूर्ण करून गाव हागणदारीमुक्त करण्यात आला आहे. करिता दिभना ग्रामवासीयांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद!

Message

शुभेच्छा संदेश

आदिवासी बहुल म्हणून शासन दरबारी नोंद असलेला आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला गडचिरोली जिल्हा सर्वदूर प्रसिद्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन आजही भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करताना अनुभवास येते. लोकांनी लोकनाट्याच्या माध्यमाने लोककला आजही जिवंत ठेवलेली आहे. शेतकरी व कष्टकरी वर्ग पारंपारिक तसेच आधुनिक पद्धतीने आपली उपजीविका चालवित आहे. भातशेती हा प्रमुख व्यवसाय आढळून येतो. येथे महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतून खेडी विकसित होत आहे. राष्ट्रसंघाचे विचार एकात्मता, सर्वधर्म समभाव असलेली चित्रे पाहावयास मिळत आहे. लोकांना आवश्यक सोयी-सुविधा, ग्रामीणविकास, बालविकास तसेच ग्रामविकास साधल्या जातात.
वरील पार्श्वभूमी मला गडचिरोली पासून काही अंतरावर असलेल्या दिभना या गावात दिसून आली. या गावाला भेट दिल्यानंतर पहिले लक्ष जाते ते म्हणजे स्वच्छतेकडे. यामुळे गावात नियमित ग्रामपंचायतीं द्वारे उपक्रमांतून मोहीम राबविली जात आहे. ही गोष्ट इतरांना प्रेरणादायी आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात गावाने उत्कृष्ट कामगिरी बजावित जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला व तालुक्यात पंचायत समितीला बहुमान प्राप्त करून दिला. ही बाब सर्वांसाठी भूषणावह आहे. गावात विविध योजनांचा पुरा यावा असा पाठपुरावा ग्रामपंचायत सचिव तसेच पदाधिकारी यांचेमार्फत केला जातोय. यामुळे ग्रामपंचायत विविध अभियानांत सहभगी होणार असल्याचे त्यांचे पूर्वतयारी करून लक्षात येते. गडचिरोली जिल्ह्यातील दिभना नावाचे गाव हिरवेबाजार, पाटोदा सारखे महाराष्ट्राचे नकाशावर झळकेल इतका मला आत्मविश्वास आहे.
गावाचा पुन्हाकार हा गावाला यशोशिखरावर नेण्यास निश्चितच भविष्यात कारणीभूत ठरेल हा सुद्धा आशावाद आहे. गावात राबविले जाणारे उपक्रम एक चांगली लोक चळवळ निर्माण करीत आहे. आपल्या विकासात्मक कार्यात मी प्रशासकीय प्रमुख या नात्याने पुन्हा पुन्हा आभारभरून शुभेच्छा व्यक्त करतो.

Governance

सुशासनयुक्त गाव

ग्रामपंचायत दिभना पंचायत समिती गडचिरोली जिल्हा परिषद गडचिरोली ही ग्रामपंचायत सन 2024-25 या आर्थिक वर्षात ISO दर्जा प्राप्त झालेला असून सदर ग्रामपंचायतीच्या प्रशासन हे चांगले आहे. ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत असून सरपंच कक्ष, सचिव कक्ष, आपले सरकार सेवा केंद्र, कर्मचारी कक्ष, ग्रामसभा सभागृह स्वतंत्र आहेत. आपले सरकार सेवा अंतर्गत नागरिकांना सर्व सेवा Online पुरविल्या जातात. पुरविण्यात येणाऱ्या सेवांचे रेट बोर्ड तसेच लागणारे कागदपत्रे यांचे सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. लोकसेवा हमी कायद्याच्या अंतर्गत 7 दिवसांच्या आत नागरिकांना दाखले पुरविले जात असून 2020 मध्ये ग्रामपंचायत कागद विरहित झालेली आहे.
ग्रामपंचायतीचे नियमित मासिक सभा व ग्रामसभा घेऊन इतिवृत्तांत अद्यावत केला जातो. ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक व वार्षिक आराखडा ग्रामसभेत तयार करून ई-ग्रामस्वराज प्रणालीवर नोंदविला जातो. ग्रामपंचायतीचा मासिक व वार्षिक जमा खर्च ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येतो. ग्रामपंचायतीची कर वसुली मागील 7 वर्षांत 100% असून नागरिकांना QR कोडने Online भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
गावात पिण्याच्या पाण्याचे स्रोत पुरेसे असून नळयोजने मार्फत गावात घराघरापर्यंत नळ कनेक्शन पोहचविलेले आहे. ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची, ग्रामसभेची माहिती सामाजिक प्रसारमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोचविली जाते. ग्रामपंचायत ODF+ Model असून ग्रामपंचायतीनी विविध पारितोषिके मिळविलेले आहे.
अमृत महा आवास अंतर्गत जिल्हातून सर्वोत्तम ग्रामपंचायत, स्वच्छता अभियान जिल्हातील प्रथम, विभागस्तरीय तिसरा व तालुकास्तरीय स्मार्टग्राम पहिला क्रमांक पटकाविलेला आहे. ग्रामपंचायतीचा PMAY शबरी, रमाई, मोदी आवास चे उद्दिष्टे 100% पूर्ण आहेत.
ग्रामपंचायतीचे वाचनालय असून गावात 2 अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आहेत. कार्यालयात CCTV लावण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायत येथे असलेल्या सर्व समित्यांचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायत परिसर हा स्वच्छ व सुंदर असून सर्वत्र हिरवळ आहे. ग्रामपंचायतीत नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार ठेवण्यात आलेली असून तक्रार निवारण 7 दिवसांच्या आत करण्यात येते.

Development

ग्रामविकास आणि सुविधा

पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय, सीसीटीव्ही प्रणाली, QR कोड तक्रार निवारण, तसेच डिजिटल सेवा उपक्रमांमुळे गाव 100% सुशासनयुक्त बनले आहे.

गावाची माहिती (२०११ च्या जनगणनेनुसार)

Female

स्त्रिया

804

Male

पुरुष

820

Family

कुटुंब संख्या

339

Population

एकूण लोकसंख्या

1624

गावाची भौगोलिक माहिती
एकूण क्षेत्रफळ: 454.93 हे. आर.
पिकाखालील क्षेत्र: 251.19 हे. आर.
पडीत क्षेत्र: 9.08 हे. आर.
वनाखालील क्षेत्र: 122.30 हे. आर.
पाणाखालील क्षेत्र: 71.8 हे. आर.
मुख्य पिके: खरीप-भात, हरभरा, तूर, मका
जॉब कार्ड कुटुंबे: 340